साखर चौथ गणपती उत्सवानिमित्त धर्मराज माने यांनी दिला व्यसन मुक्तीचा संदेश

कोलाड : कल्पेश पवार 

साखर चौथ या दीड दिवसांच्या गणपतीचे आगमन शुक्रवार दि.28 रोजी संकष्ट् चतुर्थी दिवशी मोठया थाटात झाले असून धाटाव मधील धर्मराज माने परिवारांनी या उत्सव निमित्त, व्यसन मुक्ती,स्त्रिया वरील होणारे अत्याचार, स्त्री भुण हत्या ,व्यसन मुक्ती मंगल कळश आधी सामाजिक संदेश साखर चौथ गणेश उत्सव निमित्त दिले आहेत.


दहा दिवसांचे गणपती विसर्जन झाल्या नंतर सध्या सर्वत्र साखर चौथ या दीड दिवसांच्या गणपतीचे आगमन शुक्रवारी सकाळी झाले आहे.
असाच एक मनाचा गणपती रोहा तालुक्यातील धाटाव येथे धर्मराज माने यांच्या निवास स्थानी बसला असून,
या माने परिवारानी घरगुती गणपती उत्सव निमित्त ,व्यसन मुक्ती, स्त्रियांच्या वरील होणारे अत्याचार,स्त्री भुण हत्या,व मंगल कळस आदी सामाजिक संदेश देणारे चित्र गणपती उत्सव निमित्त प्रदर्शित केले आहेत.

आजच्या घडीला स्त्रिया वरील होणारे आत्याच्यार ,स्त्री भुण हत्या,तर युवा पिठी ही देखील मोठया प्रमाणावर व्यसनाकडे वळली आहे,त्यामुळे या वाढत्या ,स्त्री भुण हत्या,व्यसनाहीन तरुणाई यांना वेळीच आला बसावा या उद्देशाने गणपती चरणी ठेवलेले मंगल कळश आदी सामाजिक संदेश माध्यमातून नकीच समाजात परिवर्तन घडवून येईल. त्यामुळे धर्मराज माने यांनी समाजात स्त्रियांवरील होणारे अत्याचार,व युवकांमध्ये वाढत जाणारे व्यसन थांबवण्या साठी दिलेला सामाजिक संदेश खूप प्रेरणादायी ठरणार आहे.

तर या गणपतीच्या दर्शना साठी रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा कु.अदिती तटकरे,धाटाव सरपंच विनोद भाऊ पाशीलकर,आदी मान्यवरांन सह मोठया प्रमाणात ग्रामस्थ ,युवक यांनी हजेरी लावली होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत