साडे दहा लाखांची घरफोडी, चोरटा दोन तासात गजाआड

पुणे : रायगड माझा

राहत्या सोसायटीच्या टेरेसवरून बाल्कनीत उतरून सदनिकेतील साडेदहा लाखांचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज चोरणाऱ्या एक सराईत चोरास चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी हा गुन्हा दोन तासात उघडकीस आणला.

हिम्मत पीटर डी रीबेला (रा. अल्ट्रीस ड्रोम सोसायटी, वाढेश्वरनगर, चंदननगर) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी तनय गोविंद अग्रवाल (वय 30, रा. अल्टीस ड्रोम सोसायटी) यांनी फिर्यादी दिली होती.
यावेळी पोलिसांनी चोराच्या ताब्यातून सोन्या-चांदीचे दागिने, परकीय चलन असा चोरून नेलेला तब्बल साडेदहा लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला.

चंदननगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची सदनिका  6 मे ते 8 मे या कालावधीत बंद होती.
या कालावधीत आरोपीने टेरेसवरून बाल्कनीमध्ये उतरून गॅलरीचे कुलूप तोडून सदनिकेमध्ये प्रवेश केला आणि कपाटातील सोन्याचे व हिऱ्याचे दागिने, परकीय चलन, स्पीकर व हेडफोन चोरून नेले होते.
सदरची चोरी संशयित आरोपी हिम्मत रिबेला याने केल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली.
आरोपी हा सराईत गुन्हेगार असून 2012 ते 2015 या कालावधीत  त्याने 26 घरफोड्या केल्या असून येरवडा पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र मुळीक यांनी दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत