सातारा पोलिसांनी जपली कर्तव्याची वारी

फलटण:रायगड माझा 

पोलिस म्हटल की करड्या आवाजाचा माणुस, तोंडात दंडेलशाहीची भाषा पण हाच पोलिस जेव्हा भेटी लागी जीवा । लागलीसे आस ।।पाहे रात्रंदिवस वाट तुझी ।। या ओळी गुणगुणतो अन तेही वारकऱ्यांच्यात मिसळुन. प्रथम दर्शनी कोणत्या तरी चित्रपटाची काहणी सांगतो आहे असे वाटत असले तरी ही काहणी आहे सातारच्या माझ्या बहाद्दुुर पोलिसांची. वारकऱ्यांना कसलाही त्रास होऊ नये यासाठी सातारा पोलिस दलाने प्रतीवर्षीप्रमाणे नियोजन केले असले तरी यावर्षी जरा अभिनव प्रयोग केला आहे.

वारकऱ्यांना त्रास तर झाला नाही पाहीजे,पण हे करत असताना सतत पोलिस सोबत आहेत या भावनेने त्यांना अवघडल्यासारखे वाटु नये यासाठी जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांनी वारकऱ्यांच्या वेशातील पोलिसांचे पथक तयार करत कर्तव्याची वारी जपली आहे.

ज्ञानोबा – माऊली तुकाराम… बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम या जयघोषानं आता पंढरपूरच्या पालखी मार्गावरचा आसमंत दुमदुमून निघाला आहे. लाखोंच्या संख्येनं वारकरी या पारंपरिक आषाढी वारी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन आपल्या लाडक्‍या विठुरायाच्या दर्शनासाठी निघाले आहेत. या सर्व वारकऱ्यांचा पांडूरंगावर विश्‍वास असला तरी त्यांच्या सुरक्षेसाठी सातारा पोलिस दलाने खुप  काळजी घेतली आहे.

खाकी वर्दीतील पोलिसाला पाहून काही गुन्हेगार पळ काढतात पण ते दुसऱ्या ठिकाणी वारीतच आपला हात साफ करतात. नेमके हेच हेरून चाणक्ष जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांनी वारकऱ्यांच्या वेशातील पोलिस पथक तयार करून चोरट्यांना आळा तर घातलाच पण पोलिसांच्या आत दडलेला वारकरीसुध्दा शोधला असेच म्हणावे लागेल.

आपल्यामध्ये असलेलं मीपण काढून टाकायचं असेल, तर वारीमध्ये जायलाच हवं असं म्हटलं जातं. मी तु पण गेले वाया, भेटता पंढरीच्या राया… असं संतांनी आपल्या अभंगांमध्ये म्हटलं आहेच. वारीमध्ये तमाम वारकऱ्यांसोबत प्रवास केल्यानंतर आपल्यामध्ये एक सांघिक भावना वाढीस लागते. एवढंच नाही, एकमेकांना सोबत घेऊन जाण्याची सवय जडते. घर-संसारापासून तब्बल एक महिनाभर आपण दूर असतो, तरीही या वारकरी कुटुंबात सहभागी झाल्यानंतर आपल्याला आपल्या कुटुंबीयांची आठवणही येत नाही.

हीच शिकवण सर्व संतांनी आपल्याला घालून दिली आहे. पण त्याचं अनुकरण आपण आपल्या आयुष्यात केलं तर, त्याची खरी किंमत आपल्याला कळू शकेल. अस जेव्हा नुकतेच प्रशिक्षण पुर्ण करून आलेल्या अंजली बामणे सांगतात तेव्हा ही कर्तव्याची वारी भविष्यात किती खोलवर रुजेल याचा अंदाज आल्यावाचुन राहत नाही.
वारी सोहळ्याची ही परंपरा गेल्या 350 वर्षांपेक्षाही अधिक जुनी आहे. अगदी सुरुवातीपासून वारीमधली शिस्त ही सगळ्यांच्या आयुष्याला एक वेगळं वळण लावून जाते. लष्कारामध्ये अनुभवायला मिळणारी शिस्त वारीत गेलं की, शिकायला मिळते. वारी हा सोहळा नसून तो आनंदाचा उत्सव आहे.

या उत्सवाला कोणतेही गालबोट लागु नये यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांची कामगिरीचे वर्णन करायचे झालेच तर कर्तव्याची वारी असच होऊ शकते. पोलिसांच्या या वारीतील,नियोजनाची अन वारकऱ्यांच्या वेशातील पथकाची पथाका महारष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील पोलिस दलाने राबण्याची गरज आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत