साताऱ्यात दोन वाईनशॉपवर गुन्हे दाखल

अवैध दारू विक्रीप्रकरणी कारवाई

रायगड माझा वृत्त

सातारा-सातारा शहरात देशी दारू विकणाऱ्या तिघांसह त्यांना विक्रीस दारू उपलब्ध करून देणाऱ्या दोन वाईन शॉप चालकांवर गुन्हा दाखल झाला. देशी दारूची चोरटी विक्री करणाऱ्या दाखल गुन्ह्यात एकूण पाच जणांचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल अविनाश चव्हाण व अभय साबळे यांनी दोन वेगवेगळ्या तक्रारी सातारा शहर पोलिस ठाण्यात दिल्या आहेत.

सातारचे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राजामाने यांना साताऱ्यातील सदर बझार येथे दोन युवक राहत्या घरीच देशी दारूची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी भरारी पथकातील पो.उपनिरीक्षक नानासो कदम यांना करावाईच्या सुचना दिल्या होत्या. मिळालेल्या सुचनेनुसार कदम यांनी पो.ना.मुल्ला,चव्हाण,साबळे,साळुंखे,ढाणे यांच्यासह सदर बझार येथील दोन ठिकाणी छापा टाकला. पहिला छापा सदर बझार येथील भिमाबाई आंबेडकर नगरातील जावेद बन्सी सय्यद याच्या घरी छापा मारला. त्यावेळी सय्यण 1 हजार सातशे सोळा रूपयाची देशी दारू पोलिसांना सापडली. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने बॉम्बे रेस्टॉरंट जवळील सातारा वाईन शॉप येथून आणल्याची कबुली दिली. त्यानंतर जावेद बन्सी सय्यद याच्यासह सातारा वाईन शॉपचा मालक प्रभाकरद हा घराशेजारील कॅनॉलवर दारू विक्री करताना सापडला.

त्याच्याकडे एकू भोसले यांना अटक केली. या गुन्ह्याची तक्रार पोलिस कॉन्स्टेबल अभय साबळे यांनी दिली आहे.

तर दुसऱ्या छाप्यात पोलिसांनी सदर बझार येथील चेतन सोळंकी याच्यासाठी हनुमान मंदीराजवळ देशी दारू विकणाऱ्या चंदन वाघ याला 1 हजार 300 रुपयाच्या दारूसह ताब्यात घेतला. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने आपण चेतन प्रदीप सोळंकी रा. सदर बझार,सातारा याच्यासाठी दारूची विक्री करत असून, ती दारू वाढे फाटा येथील गोल्डन वाईन शॉप येथून आणल्याची कबुली दिली. या गुन्ह्यात देशी दारू विक्रीप्रकरणी चंदन वाघ व चेतन सोळंकी यांच्यावर तर त्यांना विक्रीसाठी दारू उपलब्ध करून दिल्याने गोल्डन वाईन शॉपचा मालक सुरज केंजळे यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याची तक्रार पोलिस कॉन्स्टेबल अविनाश चव्हाण यांनी दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत