साताऱ्यात वळीवाच्या पावसाने झोडपले

सातारा : रायगड माझा

गेली अनेक दिवस उकाड्याने हैराण झालेल्या सातारकरांना आज (गुरूवारी) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास आलेल्या वळीवाच्या पावसाने चांगलेच झोडपले. असह्य उन्हाच्या झळा सोसत उकाड्याने हैराण सातारकरांना वळीवाच्या पावसामुळे सुखद गारवा मिळाला. सुमारे आर्धा तास सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील वीज गायब झाली होती. तर शहरात सुरू असलेल्या ग्रेड सेपरेटर व काही पुलांची कामे सुरू असल्याने त्या ठिकाणी तळे साचल्याचा अनुभव सातारकरांनी घेतला. दरम्यान वादळी वाऱ्याने कोटेश्‍वर मैदान येथे सुरू असलेला सातारा फन फेअरचा पत्रा उडाल्याने मोठे नुकसान झाल्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत