सात महिन्यांत दक्षिण काश्मीरमधील ८७ युवक दहशतवादी संघटनांमध्ये सामील

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

गेल्या सात महिन्यांत दक्षिण काश्मीरमधील चार जिल्ह्यांतील ८७ युवक दहशतवादी संघटनांमध्ये सामील झाले आहेत. यात अनंतनागमधील १४, पुलवामा ३५, शोपियान २३, कुलगाममधील १५ युवकांचा समावेश आहे. याबाबतची लेखी माहिती गृह व्यवहार राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी लोकसभेत दिली आहे.

काश्मीरमधील अनेक युवक गायब होऊन ते दहशतवादी संघटनांमध्ये सामील होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत याबाबत खासदार के. अशोक कुमार आणि अश्विनी कुमार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मंत्री अहीर यांनी लेखी उत्तर दिले आहे.

सध्या जम्मू आणि काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू आहे. राज्यात राज्यपाल लागू झाल्यानंतरच्या कालावधीत १२ युवक गायब झाल्याचे दिसून आले आहे. हे यूवक गायब झाल्यानंतर दहशतवादी संघटनांमध्ये सामील झाले आहेत, अशी माहिती मंत्री अहीर यांनी दिली आहे.

केंद्र सरकार सध्या जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षेचा वेळोवेळी आढावा घेत आहे. दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. तसेच गुप्तचर यंत्रणा मजबूत करण्यात आली आहे. तसेच येथील युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. जेणेकरून ते दहशतवादाचा मार्ग सोडून देतील, असेही अहीर यांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत