सानपांच्या प्रवेशानं भाजपची डोकेदुखी वाढली! अनेक नगरसेवक रामराम ठोकणार?

मुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त 

शिवसेनेला धक्का देत माजी आमदार बाळासाहेब सानप यांना सोमवारी भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. पण सानपांच्या पक्षप्रवेशानंतर आता भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. कारण, अनेक नाराज नगरसेवक भाजपला रामराम ठोकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बाळासाहेब सानप यांनी दोन वर्षात ती पक्ष बदलले. मग अशा व्यक्तीला पक्षात प्रवेश का दिला जातोय? असा सवाल भाजपमधील एका गटाकडून विचारला जात होता. मात्र, त्यानंतरही सोमवारी मुंबईत सानप यांचा प्रवेश सोहळा पार पडला. बाळासाहेब सानपांनी केवळ दहा मिनिटात पुनर्प्रवेशाचा निर्णय कसा घेतला? याचा किस्सा फडणवीसांनी सानप यांच्या प्रवेशावेळी सांगितला.

त्यानंतर आता नाशिक भाजपात मोठी खळबळ माजण्याची शक्यता आहे. सानप यांच्या भाजप प्रवेशानंतर अनेक नगरसेवक नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे नाराज नगरसेवक पक्षाला राम-राम ठोकण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये मोठा गृहकलह निर्माण होण्याचे संकेत पाहायला मिळत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत