सानेगाव ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीच्या शांताबार्इ म्हात्रे विजयी होणार

रोहे : महादेव सरसंबे

आ.सुनील तटकरेंच्या माध्यमातून सानेगाव येथे मोठया प्रमाणात विकास कामे करण्यात आली आहे.नंदकुमार म्हात्रे यांनी अनेकदा कामासाठी पाठपुरवा केला आहे.आता आ.सुनील तटकरे, नवनिर्वाचित हक्काचे आ.अनिकेत तटकरे यांच्या माध्यमातून व मला स्वता एखादा ग्रामपंचायतीत विकास कामे करायचे असेल तर सरपंच हा हक्काचा पाहीजे.या ग्रामपंचायतीत साहेबांच्या माध्यमातून नंदकुमार म्हात्रे यांनी केलेले काम पहाता राष्ट्रवादी पक्षाचा अधिकृत थेट सरपंच पदाचा उमेदवार शांताबार्इ म्हात्रे याच विजयी होतील व त्यांच्यासमवेत सर्व सदस्य पदाचा उमेदवार विजयी होतील असा विश्वास यशवंतखार येथे आयोजित सभेत जिल्हा परीषद अध्यक्षा आदीती तटकरे यांनी व्यक्त केला आहे.

या वेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मधुकार पाटील, माजी पंचायत समिती सभापती लक्ष्मण महाले, माजी जिप सदस्य नंदकुमार म्हात्रे, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष नथुराम ठाकूर, विलास दिवकर व उमेदवार उपस्थित होते. या वेळी मधुकर पाटील यांनी यशवंतखार येथे यापुढे नंदकुमार म्हात्रे यांच्या माध्यमातून ए.टी.एम.प्रमाणे काम करण्यात येर्इल.त्यासाठी तुम्ही राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार शांताबार्इ म्हात्रे यांनी निवडून द्या.त्या.गावातच राहाणार असल्याने तुम्हाला रात्री अपरात्री त्यांना भेटता येणार आहे.या उलट आन्य उमेदवार रोह्यात राहात असल्याने तुम्हाला त्याची मदत मिळणार नाही.याचा विचार मतदारांनी करून शांताबार्इ म्हात्रे यांना निवडून देण्याचे आवाहन केले.

नंदकुमार म्हात्रे यांनी आपल्या प्रास्ताविकात आ.सुनील तटकरेंच्या माध्यमातून या ग्रामपंचायतीच्या हददीत प्रचंड विकासची कामे आनले आहेत.अंतर्गत रस्ते, पाणी योजना, मंदिराचा सभागृह यासह वाडया वस्तीवर कामे केली असल्याने भविष्यात निधी ग्रामपंचायतीमध्ये मोठया प्रमाणात आणण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाला निवडुन आणा असे आवाहन केले. यशवंतखार येथील नंदकुमार म्हात्रे यांच्या निवसस्थानी राष्ट्रवादी कार्यकर्ते व ग्रामस्थांची उपस्थितीत दणदणीत सभा झाली असुन त्यामुळे थेट सरपंचपदाचे उमेदवार शांताबार्इ म्हात्रे यांचे पारडे जड असल्याचे बोलेले जात आहे.या वेळी ग्रामपंचायत हददीतील नागरीक, महीला व तरूण मोठया प्रमाणात उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत