‘सामना’च्या आगीशी खेळू नका; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

‘सामना थोडीच सरकार चालवतं, सरकार तर मी चालवतो,’ असं मुख्यमंत्री म्हणाले होते. मुख्यमंत्र्यांच्या या खोचक टीकेनंतर आता शिवसेनेनेदेखील सामनातून जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

 

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘न्यूज18 लोकमत’च्या ‘रायझिंग महाराष्ट्र’ या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याचा आज शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तून समाचार घेण्यात आला. ‘सामना’च्या आगीशी खेळू नका. मोदींच्या भाग्याने प्राप्त झाले ते ‘सामना’च्या आगीने जळून खाक होईल, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

‘सामना थोडीच सरकार चालवतं, सरकार तर मी चालवतो,’ असं मुख्यमंत्री म्हणाले होते. मुख्यमंत्र्यांच्या या खोचक टीकेनंतर आता शिवसेनेनेदेखील सामनातून जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

काय आहे सामनाचा अग्रलेख?

चौथ्या वर्षी त्यांनी सांगितले की, ”सरकार ‘सामना’ चालवत नाही, मी चालवतो” वगैरे. मुख्यमंत्री,

‘सामना’च्या आगीशी खेळू नका. मोदींच्या भाग्याने प्राप्त झाले ते ‘सामना’च्या आगीने जळून खाक होईल. मुख्यमंत्र्यांना सकाळी उठून ‘सामना’ वाचावाच लागतो. सत्याचे कडू घोट पचवायला हिंमत लागते. ‘सामना’ हा जनतेचा लाऊडस्पीकर आणि खोटारड्यांचा आरसा आहे. मुख्यमंत्र्यांनी चौथ्या वर्षी मैत्रीचा, युतीचा सूर लावला आहे. फडणवीस म्हणतात, काही झाले तरी युती होईल. जागा वाटपावर चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. श्रीमान फडणवीस यांनी असेही सांगितले की, हिंदुत्ववादी मतांची विभागणी होऊ नये म्हणून युती अतिशय आवश्यक आहे. शाब्बास! शाब्बास देवेंद्रजी! अब आया उंट पहाड के निचे, असे आम्ही मानावे काय?

मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले होते?

२९ ऑक्टोबर रोजी न्यूज18 नेटवर्कचा ‘रायझिंग महाराष्ट्र’  कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला होता. आपलं मुखपत्र सामनामध्ये शिवसेना  मांडत असलेल्या भूमिकेबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ‘सामना सरकार चालवत नाही, मी सरकार चालवतोय,’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी  शिवसेनेवर टीका केली होती. तसंच 2019 मध्ये मीच मुख्यमंत्री होणार आहे आणि शिवसेनेचाही पाठिंबाही मला मिळेल, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत