सामाजिक कार्यकर्ते सुनिल खङकबाण यांचे अल्पशा आजाराने निधन.

  खालापूर: मनोज कळमकर

खालापूर शहरातील तरूण सामाजिक कार्यकर्ते सुनिल रमण खङकबाण यांचे वयाच्या 44व्या वर्षी रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले.

खालापूरातील सार्वजनिक गणेशोत्सव ,हनुमान मंदिर जीर्णोध्दार सह अनेक सामाजिक  उपक्रमात आघाडीवर असलेले सुनिल खङकबाण यांच्या निधनाने खालापूरवर शोककळा पसरली आहे. खालापूर येथील स्मशानभूमीत रविवारी सकाळी अकराच्या सुमारास त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.खालापूर पंचक्रोशीतील विविध क्षेञातील मान्यवर त्यांचे अंत्यसंस्काराला ऊपस्थित होते.सुनिल यांचे पश्चात पत्नी,दोन मुलगे, भाऊ,बहिण मोठा परिवार आहे.या दुःखद घटनेमुळे  खालापूर बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत