सामाजिक बांधिलकि जपत अदिवासी व दलित वस्तीतील गरजू कुटुंबाना दिवाळीनिमित्त फराळ साहित्य वाटप …

कर्जत-भूषण प्रधान

आपल्या भारत देशामध्ये दिवाळी सण हा मोठ्या उत्सहात व आनंदात साजरा केला जातो, प्रत्येकाच्या घरामध्ये दिवाळीचा फराळ बनवून दिवाळी साजरी केली जाते, परंतु गोरगरीब, मोलमजूरी, गरजू कुटुंब आहेत त्यांना आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करताना खुप मोठी अड़चन निर्माण होत असते, दिवाळी सण जवळ आला कि गोरगरीब आदिवासी व दलित वस्तीतील नागरीकांना आपण देखिल दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करावी. तसेच वेगवेगळे फराळाचे पदार्थ बनवावे असे वाटत असते. वरील सर्व बाब नेहमीच शिवसेना विधानसभा संघटक संतोष भोईर यांच्या मनाला चटके देवून जात असे, आपण आपली दिवाळी आनंदात साजरी करतो परंतु गोरगरीब, गरजू कुटुंब आहेत त्यांची देखिल दिवाळी आनंदाने व प्रत्येक आदिवासी व दलित वस्तीतील कुटुंबाच्या घरामध्ये दिवाळीचा फराळ झाला पाहिजे ह्या हेतूने शिरसे तमनाथ हद्दीतील आदिवासी वाडी, आदिवासी वस्ती, दलित वस्तीतील कुटुंबाना संतोष मारुती भोईर व संदीप भोईर यांच्याकडून सामाजिक बाधिलकी जपत दिवाळी फराळासाठी लागणारे साहित्य वाटप करण्यात आले.

गोरगरीब व गरजू कुटुंबाची दिवाळी अनंदात साजरी करणारे एकमेव नेतृत्व संतोष मारुती भोईर आपण गोरगरिब व गरजू जनतेच सुख हेच आपल सुख हा विचार मनात ठेवून नेहमीच मदतिचा हात पुढे करणारे एकमेव नेतृत्व संतोष भोईर यांच्या कार्याबद्दल कर्जत तालुक्यात सर्व नागरीकांकडून संतोष भोईर व संदीप भोईर यांचे सर्वस्व कौतुक होत आहे.

यावेळी मोठ्या संख्येने शिरसे ,तमनाथ गावातील ग्रामस्थ व परीसरातील परीसरातील नागरिक उपस्तित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत