सारा अली खान फोटोग्राफर्सवर भडकली!

मुंबई : रायगड माझा वृत्त 

आज काल सेलिब्रिटींची एक झलक आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी फोटोग्राफर्समध्ये चढाओढ लागलेली दिसून येते. सेलिब्रिटींचं घर असो किंवा जीम सर्वच ठिकाणी फोटोग्राफर्स हजर असतात. पण अनेकदा सेलिब्रिटींना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. असाच एक प्रसंग सैफ अली खानची मुलगी सारा अली खानसोबत घडला. फोटोग्राफर्समुळं साराला त्रास झाला आणि ती फोटोग्राफर्सवर भडकली, असा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

मुंबईतील एका मंदिरात सारा तिची आई अभिनेत्री अमृता सिंग आणि भाऊ इब्राहिम यांच्यासोबत दर्शनासाठी गेली होती. यावेळी मंदिराबाहेरील गरजूंना काही वस्तू दान करतानाही सारा दिसली. सारा, अमृता आणि इब्राहिम यांना पाहताच या तिघांचे फोटो काढण्यासाठी मंदिराजवळ फोटोग्राफर्सची गर्दी झाली. फोटोग्राफर्संनी साराचा पाठलाग करत तिचे फोटो काढायला सुरुवात केली. ‘हे मंदिर आहे… इथं तरी फोटो घेऊ नका… बंद करा हे’ असं म्हणत ती फोटो न काढण्याची विनंती करत होती. मात्र, फोटोग्राफर्स काही केल्या थांबेनात. शेवटी हीच गोष्ट साराला खटकली. तिनं फोटोग्राफर्संना चांगलंच खडसावलं आणि थेट कारमध्ये जाऊन बसली.

At #Juhu Temple today with brother. #SaraAliKhan

A post shared by Sara Ali Khan (@sakhanofficial) on

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत