सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिलासा, मंडपांना परवानगी देण्याची मुदत राज्य सरकारने वाढवली

मुंबई: रायगड माझा वृत्त 

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडपांच्या परवानगीसाठीची मुदत सरकारने 5 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे अद्याप मंडपांना परवानगी न मिळालेल्या मंडळांना 5 सप्टेंबरपर्यंत परवानगी मिळवण्यासाठी अर्ज करता येणार आहे.

The state government has extended the deadline for the Ganeshotsav Mandals | सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिलासा, मंडपांना परवानगी देण्याची मुदत राज्य सरकारने वाढवली

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्रीगणेशाच्या आगमनाला आता केवळ पंधरवडा उरला आहे. मात्र अद्यापही अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगी मिळालेली नाही. त्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मुंबईभाजपाध्यक्ष अशिष शेलार आणि सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे पदाधिकारी यांची बैठक झाली. यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिलासा देताना राज्य सरकारने मंडपांच्या परवानगीसाठीची मुदत 5 सप्टेंबरपर्यंत वाढवली

मुंबई उच्च न्यायालयाच्या नियमांनुसार या वर्षी गणेशोत्सव मंडळांना मंडपासाठी ऑनलाइन परवानगी देण्यात येत आहे. गणेशोत्सव मंडळांची गैरसोय टाळण्यासाठी हा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे ही प्रकिया संथगतीने सुरू असल्याने अर्जाची मुदत  तिसऱ्यांदा वाढविण्यात आली आहे. यापूर्वी मंडळांना २ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत