सार्वजनिक व्यासपीठावर भाजपच्या खासदारानं सांगितला अश्लील किस्सा

सोलापूर : रायगड माझा वृत्त 

भारतीय जनता पक्षाचे खासदार शरद बनसोडे यांनी एका सार्वजनिक व्यासपीठावर स्वतः सहित पक्षाची अब्रू अक्षरशः वेशीवर टांगल्याचा प्रकार पहायला मिळाला. खासदार शरद बनसोडे यांनी सभेचे संकेत सोडून स्वानुभवाचे प्रसंग सांगताना उपस्थित महिला आणि ज्येष्ठांचा विचार न करता अश्लील किस्सा सांगून स्वतःचे हसू करून घेतले.त्यानंतर त्यांचे भाषण त्वरित रोखण्यात आले.

खासदार बनसोडे यांच्याहा प्रकार घडला त्यांच्या जन्मगावी म्हणजे पानमंगरूळ येथे डॉ. अशोक हिप्परगी यांच्या एकसष्टीच्या कार्यक्रमात घडला. बनसोडे यांच्या बेताल वागण्यामुळे संपूर्ण कार्यक्रमाचा विचका झाला. व्यासपीठावर माजी खासदार सुशीलकुमार शिंदेही उपस्थित होते. त्यांच्यादेखत खासदार बनसोडेंनी अकलेचे तारे तोडले. बनसोडे यांच्या या बीभत्स बडबडीनंतर कार्यक्रमाचा बेरंग झाला. समोर महिला पदाधिकारी बसल्या होत्या. अखेर विद्यमान कॉंग्रेस आमदारांनी माईकचा ताबा घेतला आणि बनसोडे यांचे भाषण थांबविले.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत