साळाव ते मुरूड रस्त्याची अवस्था बिकट; खड्डेमय रस्त्यापासून कधी मुक्ती मिळणार ?

मुरुड : अमूलकुमार जैन

रायगड जिल्ह्यातील साळाव ते मुरूड रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशाना रोजच कष्टमय प्रवास करावा लागत आहे. मात्र याबाबत बांधकाम विभाग व ठेकेदार याना मात्र कोणतेच सोयरसुतक नसल्याचे  असे माजी जिल्हा परिषद सदस्य वामन चुनेकर यांनी सांगितले.
मुरूड तालुका हा पर्यटनदृष्ट्या महत्वाचा तालुका असून नेहमी पर्यटक येत असतात. मात्र रस्त्याच्या या अवस्थेमुळे पर्यटकांची संख्या हि रोडावत चालली आहे.तालुक्यातील मुख्य रस्त्यांची अवस्था हि बिकट झाली आहे. प्रवास करणार्यांना पाठदुखी कंबरदुखी,यासारख्या समस्यांनी ग्रासले आहे.  मात्रं अधिकारी फक्त आश्वासन देऊन मारून नेतो. तर दुसरीकडे ठेकेदार हा आपल्या सोयीनुसार  आहे. मात्र या सर्व प्रकारात प्रवाशी मात्र खड्डेमय प्रवास कधी संपणार याच्या प्रतीक्षेत आहेत.
येथील काही रस्त्याला फक्त डांबरीकरण  केले तरी हे रस्ते सुस्थितीत होऊ शकतात, परंतु सार्वजनिक बांधकाम खाते यावर कोणतीही उपाययोजना करण्यास तयार नाही. कोणताही राजकीय नेता या रस्त्यांकडे गांभीर्यपूर्वक पाहत नाही, तसेच सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकाऱ्यांचे देखील या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याने या रस्त्याला आता कोणीही वाली राहिला नाही, यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
मुरुड ते साळाव हा रस्ता १९९२ साली तयार करण्यात आला. हे अंतर ३२ किलोमीटर एवढे आहे, परंतु आजतागायत या रस्त्याने कधीच डांबरीकरण न  केल्याने. आता हे सुद्धा रस्ते खराब झाले आहेत.
मुरूड तालुक्यात अविश्रांत असलेल्या पावसामुळे अनेक रस्त्यावर खड्डे पडले आहेत, परिणामी सामान्य नागरिक, पादचारी वर्ग , शालेय विद्यार्थी, वाहन चालक आदिंना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून छोटे मोठे अपघात होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बोर्ली मांडला सहित तालुक्यातील नागरिक फार त्रस्त झाले आहेत. बोर्ली मांडला परिसरात आणि लगतच्या ग्रामपंचायती मध्ये रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. खडड्यात रस्ता शोधत मार्गक्रमण करावा लागत आहे, खड्डे चुकवत वाहन चालवताना अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत.  रस्त्यांवर अनेक ठिकाणी मोठंमोठे घड्डे पडले आहेत.
मुरूड तालुक्यातील साळाव ते मुरूड तालुक्यातील काही ठिकाणी काही महिन्यांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते.मात्र ते डांबरीकरणाचे काम हे तकलादू असल्याची प्रचिती ही पहिल्याच पावसात आली आहे.या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत मात्र काही ठिकाणी खड्डे पडण्याचे मुख्य कारण आहे ते खासगी नळ जोडणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी यांची कोणत्याही प्रकारची परवानगी किंवा कोणतेही शुल्क न भरता रस्ते खोदून नळजोडणी घेण्यात आल्या आहेत.नळजोडणीसाठी रस्ता खोडल्यानन्तर परत त्या रस्त्याची दुरुस्ती न करता तात्पुरत्या स्वरूपात रेती सिमेंट टाकून देण्यात येत आहे.मात्र हे सिमेंट रेती काही दिवस टिकून परत खड्डे पडण्यास सुरवात होत आहे.मात्र यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हे रस्त्यांवर खासगी नळजोडणी घेणाऱ्यांवर कडक कारवाई न करता केवळ नोटीस पाठवून दिली जाते.त्यांनी केवळ नोटीस न बजावता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे.
ज्याप्रमाणे मुरूड तालुक्यात जिओ कंपनीची केबल टाकण्यासाठी रस्त्यालगत खोदकाम करण्यात आले होते त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे मुरूड तालुका अध्यक्ष यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली होती.त्या तक्रारी नुसार मुरूड सार्वजनिक बांधकाम विभागाने जिओ कंपनीची केबल टाकणाऱ्या ठेकेदारावर रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रमाणे आताही खासगी नळ जोडणी घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी समाजवादी पक्षाच्या अलिबाग मुरूड विधानसभेच्या महिला अध्यक्षा सारिका माळी शिंदे यांनी केली आहे.
बोर्ली ते मांडला या दरम्यान असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावर मोठमोठ्या स्वरूपात खड्डे पडले आहे त्या रस्त्यांची दुरुस्ती लवकरात लवकर व्हावी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग मुरूड यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. 
अमूलकुमार भलगट.माजी सदस्य,अखिल सदस्य,अखिल कांठा प्रांतीय जैन ओसवाल साजणा संघ.महाराष्ट्र राज्य
बोर्ली ते मांडला रस्त्याची दुरुस्ती ही लवकरात लवकर करण्यात आली नाही तर सार्वजनिक बांधकाम विभाग मुरूड यांच्या विरोधात जनआंदोलन छेडण्यात येईल.
वामन चुनेकर. माजी सदस्य, रायगड जिल्हा परिषद.
सदर रस्त्यावर पडलेले खड्याची डागडुजी करण्याबाबतची मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.:-नौशाद दळवी सरपंच,ग्रुप ग्राम पंचायत. बोर्ली-मुरूड
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.