सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पुणे : रायगड माझा 

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना जनवाडी येथील पाचपांडव सोसायटीमध्ये घडली. याप्रकरणी पतीसह चौघांविरुध्द चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अफरिन अफझल शेख, असे गळफास घेतलेल्या विवाहितेचे नाव आहे.

तिचा पती अफझल मेहबूब शेख (28) व दीर आरिफ मेहबूब शेख (26) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी शीराजुद्दीन मुल्ला (40, रा. औरात, बिदर, कर्नाटक) याने फिर्याद दिली आहे. शीराजुद्दीन यांची बहिण अफरिन हिचा विवाह अफझल याच्याबरोबर झाला होता. विवाहानंतर सासरचे माहेरुन पैसे आणावेत यासाठी तिचा छळ करत होते. या शारीरिक व मानसिक छळास कंटाळून तिने बुधवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक भोसले तपास करत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.