सिंदखेडराजाला होणाऱ्या केजरीवाल यांच्या सभेला परवानगी नाकारली

रायगड माझा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सिंदखेड राजा येथे होणाऱ्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ही परवानगी नाकारण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त 12 जानेवारी रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे येणार होते. जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त केजरीवालांच्या उपस्थितीत शेतकरी मेळ्याव्याचे आयोजनही करण्यात आले होते. मात्र, आता पोलिसांनी कार्यक्रमाला परवानीच नाकारली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ही परवानगी नाकारण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याने ‘आप’चे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी पोलिस स्टेशनसमोर आंदोलन सुरु केले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत