सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वे विस्कळीत

मुंबईः महाराष्ट्र News 24 वृत्त

भांडूप रेल्वे स्थानकाजवळ दुपारी ३ वाजता सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सिग्नल यंत्रणेमध्ये झालेल्या बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या धीम्या आणि जलद मार्गावरील सेवा काही वेळासाठी ठप्प झाली होती.

भांडूप स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. या बिघाडाचा परिणाम रेल्वेच्या अप आणि डाऊन धीम्या तसेच जलद मार्गांवर झाला. या बिघाडाचा सर्वाधिक फटका जलद मार्गावरील प्रवाशांना बसला. बऱ्याच वेळ लोकल सुरू नसल्यामुळे अनेक स्थानकावर मोठी गर्दी झाली. रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे दुपारची वेळ असूनही प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. भांडूप रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याची माहिती मध्य रेल्वेने ट्विटरवरून दिली. यंत्रणेत बिघाड झाल्याची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी आणि तंत्रज्ञ घटनास्थळी पोहोचले.

दरम्यान, भांडूप सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त करण्यात आला असून, धीम्या आणि जलद मार्गावरील सेवा सुरू करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. रेल्वे सेवा सुरू झाली असली, तरी मध्य रेल्वेवरील लोकल १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत