सिडकोच्या १४ हजार ८६८ घरांची आज सोडत

नवी मुंबई : रायगड माझा वृत्त 

सिडकोच्या तब्बल १४ हजार ८६८ घरांची लॉटरी आज 11 वाजता जाहीर होणार आहे. तळोजा, खासघर, घणसोली, कळंबोली, द्रोणागिरी येथे ही घरांची लॉटरी जाहीर करण्यात आली होती. आर्थिक दुर्बल घटक अल्प उत्पन्न गटासाठी ही घरं असून त्यांच्या किंमती १८ ते २६ लाखांच्या दरम्यान आहेत. यामध्ये तळोज्यात सर्वाधिक ८ हजार ५०० घरं आहेत.

२०१९ पर्यंत घरांचा ताबा देण्याचा प्रयत्न असल्याचं सिडकोनं जाहीर केलं आहे. सिडकोच्या १४८३८ घरांसाठी तब्बल 2 लाखाहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. तर स्वातंत्र्यदिनापासून ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात येत होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत