‘सिद्धू यांनी मुंबईत पाऊल ठेवलं तर त्यांचे हात-पाय छाटू’

मुंबई : रायगड माझा वृत्त 

माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धूने पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांच्या घेतलेल्या गळाभेटीवर भाजपच्या अल्पसंख्याक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आझाद मैदानात सोमवारी भाजप कार्यकर्त्यांनी सिद्धूविरोधात मोर्चा काढला. सिद्धू यांनी मुंबईत पाऊल ठेवलं तर त्यांचे हात-पाय छाटू, अशी संतप्त प्रतिक्रिया भाजपचे वरिष्ठ नेते आणि दर्गा समिती अजमेरचे सदस्य मोहम्मद फारुख आजम यांनी व्यक्त केली.

mumbai muslim organisation angry at navjpt singh siddhu over pakistan visit
आजम म्हणाले, ‘सिद्धू यांना अटक करून त्यांच्यावर देशद्रोहाच्या आरोपाखाली खटला चालवला जात नाही, तोपर्यंत आम्ही ठिकठिकाणी धरणे आंदोलन करू. सिद्धूने मुंबईत पाऊल ठेवले तर त्यांचे हात-पाय छाटू.’ जमीतुल उलेमा, मुंबईचे अध्यक्ष मौलाना कासमी यांनीही सिद्धूवर टीका केली आहे.

आझाद मैदानात आंदोलन केल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी सिद्धूचे पोस्टरही जाळण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रोखले. सिद्धूविरोधात त्यांनी घोषणाही दिल्या. बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये सोमवारी एका कोर्टात सिद्धूविरोधात राजद्रोहासह अनेक आरोप असलेला खटला दाखल झाला आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत