सिन्नर येथे एसटी आणि कारचा भीषण अपघात, 4 तरुण ठार

कोपरगाव : रायगड माझा ऑनलाईन 

सिन्नर तालुक्यातील पांगरी शिवारात कार आणि एसटीबस यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात कारमधील 4 युवक जागीच ठार झाले. अपघातात ठार झालेले चारही युवक कोपरगावचे रहिवासी आहेत. मृतांमध्ये सोनू चिने, आकाश पाटील, पंकज वाळूंज आणि सौरभ पाटील यांचा समावेश आहे. 4 तरूणांच्या मृत्युमुळे कोपरगावमध्ये शोककळा पसरली आहे.

शुक्रवारी संध्याकाळी उशिरा कोपरगाव येथील 4 तरूण त्यांच्या आय 20 कारने नाशिकहून शिर्डीकडे जात होते. सिन्नर तालुक्यातील पांगरी शिवाराजवळ कार आणि समोरून येणाऱ्या शिर्डी-मुंबई निमआराम एसटी बस यांच्यात समोरासमोर टक्कर झाली. या भीषण आपघात कारचा चक्काचूर होऊन कारमधील चौघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानीक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत चौघांचा मृत्यू झाला होता. चारही जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सिन्नर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत