सिमेंट जंगले व रेडीयशनमुळे पक्षांचे अस्तित्व होत आहेत नष्ट

खोपोली : समाधान दिसले (प्रतिनिधी)

आठवत असेल का तुम्हांला पंधरा वीस वर्षापूर्वी ती चिवचिवाट करणारी आजीने दाखविलेली चिमणी. इकडे तिकडे मान फिरवीत चिवचिव करणारा व आजीच्या कडेवरून डुगुडुगु मान सावरत तू बोळकं पसरून, हसून स्वागत केलेला तो इवलासा पक्षी म्हणजेच चिऊताई.
चिमणी वाचवा या चळवळीसाठी २०मार्च हा जगभरात ‘चिमणी दिन’ म्हणून पाळण्यात येतो. सिमेंटच्या जंगलामुळे तसेच सर्वत्र ठिकाणच्या मोबाइल टॉवर्समुळे चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. शहरात तर चिमण्यांची चिव चिव देखील ऐकावयास मिळत नाही. मुक्या प्राण्यांना अन्न पाणी देण्याची संस्कृती शहरात लोप पावत चालली आहे. त्यामुळे चिमण्यांचे व अन्य पक्षांचे संवर्धन करण्याची काळाची गरज बनली आहे.
पूर्वीचे बालपण सुद्धा चिऊ ताईचा घास खाल्ल्याशिवाय आणि बाळाच्या डोक्यावरून भुर्रर्र उडून जा म्हटल्याशिवाय सरलं नाही. अंगणात निवडली, पाखडली जाणारी धान्ये या चिमण्यांना दाणे पुरवतच व तसेच धान्यात असलेले किडे, अळय़ांची पण मेजवानी चिमण्यांना मिळायची. पण आता या चिऊताई दिसेनासा झाल्याने मोठ्या प्रश्न चिन्ह उभा राहिला आहे. पूर्वजांच्या लहानपणी चिऊ ताई, चिऊ ताई म्हणत जेवण करायचे. किंवा प्रत्येकाची आई त्याला सांगायची कि लवकर खा नाहीतर चिऊ ताई येऊन खाऊन जाईल. पण आता पुढच्या पिढीला हे कोण सांगणार आणि कसे सांगणार. कारण आपल्या लाडक्या चिऊताई सध्या गायब होत चालल्या आहेत.
चिऊ ताई दिवसेंदिवस कमी होत चालल्या आहेत. काही वर्षापासून आपल्याला सकाळी पक्ष्यांचा आवाज पण आयकू येत नाही. दिवसेंदिवस संध्याकाळी त्यांचा परतीचा थवा हि दिसत नाही. एवढेच काय तर काही पक्षी जसे बगळा, घार यासारखे पक्षी तर दिसेनासे झाले आहेत. आता तरी सर्व जण जर लवकर जागे नाही झालो तर “एक होता काऊ आणि एक होती चिऊ” आपल्या पुढच्या पिढीला आपण एवढेच सांगू शकू, त्यांना दाखवू नाही शकणार. त्यामुळेच पक्षांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. जेणेकरुन पुढील पिढीला या सर्व पक्षांचे अस्तित्व समजेल.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत