सिलिंडर स्फोटाने कल्याण पुन्हा हादरले, आगीत ४ जण गंभीर जखमी

कल्याण : रायगड माझा ऑनलाईन 

चायनीज हॉटेलमध्ये सिलिंडरच्या स्फोटात अग्निशमन जवानाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी मध्यरात्री पुन्हा एकदा सिलिंडर स्फोटाने कल्याण हादरले आहे. शहरातील योगीधाम परिसरात घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने लागलेल्या आगीच चार जण  होरपळून गंभीर जखमी झाले.

योगिधाम परिसरातील त्रिमुर्ती चाळीत रात्री गॅस गळती होत होती. यामुळे राहिवाशांनी संबंधित कंपनीच्या मेकॅनिकला बोलावले होते. गॅस सिलिंडरची तपासणी सुरू असतानाच अचानक स्फोट झाला. यामुळे लागलेल्या आगीमध्ये चौघे जण गंभीर भाजले. जखमी झालेल्या व्यक्तीमध्ये एका लहानग्याचाही समावेश असून पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात सर्वांवर प्राथमिक उपचार केल्यानंतर मुंबईतील सायन रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ताज्या माहितीनुसार जखमींपैकी दिपाली पाटील आणि कल्पना भावे या दोघीजणी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत