सुई धाग्यांवरून अनुष्का शर्मा बनली ‘मेम्स’ची शिकार!

मुंबई : रायगड माझा वृत्त 

सोशल मीडियावर कोण, कधी आणि कोणत्या कारणांमुळे ट्रोल होईल याचा काही नेम नाही. काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमधील आगामी सिनेमा सुई धागाचा ट्रेलर लॉन्च करण्यात करण्यात आला आहे. या सिनेमातील अनुष्का शर्माचा लूक सध्या खूपच चर्चेचा विषय बनला आहे. या  लूकचा वापर अनेक मेम्समध्ये केला जात आहे. 

 

अनुष्काचा लूक चर्चेत  

अभिनेत्री अनुष्का शर्मा सुई धागा सिनेमात अत्यंत नॉन ग्लॅमरस अंदाजात आहे. निळ्या साडीतील, मेकअपशिवायचा अनुष्काचा चेहरा सध्या अनेक ठिकाणी तुम्हांला दिसला असेल. अनेक नेटकर्‍यांनी त्यांची कल्पनाशक्ती वापरून अनेक मजेदार मेम्स बनवले आहेत.

अनुष्का शर्माचे वायरल मेम्स

 

नेमके आहे तरी काय हे मेम्स?

अलीकडे इन्स्टाग्राम, फेसबुक स्टोरीज म्हणून वेगवेगळ्या वस्तुस्थितीस अनुसरून आणि काहीशा अतिशयोक्तीने हे ‘मेम्स’ प्रसारित केले जातात. ज्यात मनोरंजनाच्या उद्देशाने स्वत:ला एका अर्थाने प्रसिद्धी मिळविण्यासाठी करण्यात येणारी क्लृप्ती म्हणता येईल. स्वत:ला अपडेट ठेवता यावे यासाठी तरुणांकडून मोठय़ा प्रमाणात अशा मेम्सला प्रसिद्धी मिळते. सध्या सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेणारा हा समाजमाध्यमांचा एक प्रकार आहे. एखादा प्रसिद्ध चित्रपट, वेब सीरिजमधील कलाकारांचे छायाचित्र घ्यायचे आणि त्या कलाकारांच्या भूमिकेत विनोदी संवाद तयार करायचे, अशी ही प्रक्रिया. सर्वाधिक उपयोगात येणारे सोशल मीडिया अ‍ॅप्स म्हणजे इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आहेत. यापैकी इन्स्टाग्राम हे मेम्स प्रसारित केले जाणारे सर्वाधिक लोकप्रिय अ‍ॅप आहे. एखादा सिनेमा प्रसिद्ध झाल्यावर हमखास मेम्स बनवले जातात. हल्लीच्या आधुनिक उपक्रमांचा वापर करून एखाद्यावर विनोदी उपरोधक टीका करणे म्हणजे ‘मेम्स’..

तरुण काय म्हणतात..

काही तरुणांना या मेम्सबद्दल विचारले असता त्यांनी यामागची त्यांच्या कल्पनेत असलेली पाश्र्वभूमी सांगितली. एकंदरीत सध्याच्या काळात आपल्या आजूबाजूला लक्ष वेधून घेणाऱ्या गोष्टींवर हे गमतीशीररीत्या बनवण्यात येतात. हे मेम्स कित्येकदा समाजमाध्यमांवरून कॉपी पेस्ट करण्यात येतात. स्टोरीज म्हणून वेगवेगळ्या अ‍ॅप्ससाठी वापरण्यात येतात. कित्येक मेम्सप्रेमी मंडळी तर स्वत: हे बनवण्यात माहीर असतात, शिवाय त्यांना यावर मोठय़ा प्रमाणात प्रतिसाददेखील मिळतो. बहुतांश वेळा राजकीय गोष्टींचा आणि घडामोडींचा यात समावेश नसतो. आजच्या तारखेला आपल्या भोवताली ज्या गोष्टींचा सर्वाधिक परिणाम आजच्या पिढीवर होत आहेत त्या गोष्टी ग्राह्य़ धरल्या जातात. काही लोक या गोष्टींमध्ये इतके अग्रेसर असतात, की त्यांची ओळख या मेम्सच्या विषयापासून निघते म्हणजेच त्यांना त्यांच्या मित्रपरिवारामध्ये मेम्सवरून ओळखण्यात येते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत