सुखोई ३० MKI विमान पुन्हा हवाई दलात दाखल

नाशिक : रायगड माझा वृत्त 

ओझर येथील हवाई दलाच्या केंद्रात देखभाल आणि दुरुस्ती केलेले सुखोई ३० (एमकेआय) हे लढाऊ विमान शुक्रवारी (२६ ऑक्टोबर) हवाई दलाकडे सुपूर्द करण्यात आले. त्याचा शानदार सोहळा ओझर येथील केंद्रात शुक्रवारी संपन्न झाला.

ओझर येथील हवाई दलाचे केंद्र हे देखभाल आणि दुरुस्तीचे आहे. सुखोई ३० (एमकेआय) या विमानाची निर्मिती ओझर येथील हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये केली जाते. तसेच, त्याची देखभाल आणि दुरुस्तीही एचएएलकडेच होते. मात्र, ओझर येथील हवाई दलाच्या केंद्रात प्रथमच सुखोई विमानाची देखभाल आणि दुरुस्ती करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्याचे काम या केंद्रात सुरू होते. अखेर या विमानाचे काम पूर्ण झाले. त्याची पहिली हवाई चाचणी गेल्या २४ एप्रिल रोजी घेण्यात आली आहे. ती यशस्वी झाल्याचे ओझर हवाई दल केंद्राचे एअर कमोडोर समीर बोराडे (विशिष्ट सेवा मेडल) यांनी दिली. हे विमान हवाई दलाच्या दक्षिण पश्चिम कमांकडे सूपूर्द करण्यात आले.

हा हस्तांतर सोहळा ओझरच्या केंद्रात शुक्रवारी सकाळी संपन्न झाला. याप्रसंगी हवाई दलाच्या मेन्टेनन्स कमांडचे प्रमुख एयर मार्शल हेमंत शर्मा (अति विशिष्‍ट सेवा मेडल व विशिष्‍ट सेवा मेडल) यांनी दक्षिण पश्चिम विभागाचे प्रमुख एयर मार्शल एच एस अरोरा (अति विशिष्‍ट सेवा मेडल) यांच्याकडे विमानाची कागदपत्रे सुपूर्द केली. याप्रसंगी हवाई दलाच्या बँड पथकाने सलामी दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत