सुजय विखे भाजपकडूनच दक्षिणेचे खासदार : आमदार शिवाजी कर्डिले

मिरी : रायगड माझा वृत्त 

आगामी काळात होणा-या लोकसभेच्या निवडणुकीत नगर दक्षिण मतदारसंघातून डॉ.सुजय विखे हे भाजपाच्याच तिकीटावर निवडून येतील, असे प्रतिपादन आमदार शिवाजी कर्डिले यांनी केले आहे. पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे एका कार्यक्रमात कर्डिले बोलत होते.

Sujay Dikh will be a South MP from BJP: MLA Shivaji Kardile | सुजय विखे भाजपकडूनच दक्षिणेचे खासदार : आमदार शिवाजी कर्डिले
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून डॉ.सुजय विखे निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झालेले आहे. विखे व आमदार कर्डिले यांनी एकत्र लढविलेल्या राहुरी कारखाना व बाजार समित्यांच्या निवडणुकीमुळे कर्डिले व विखे यांची जवळीक लपून राहिलेली नाही. त्यातच भर म्हणून आमदार कर्डिले यांनी अनेकवेळा विखे यांना भाजपात येण्याची खुली आॅफर दिलेली आहे. त्याचीच पुनरावृत्ती मिरी(ता.पाथर्डी) येथे आयोजित एका खाजगी कार्यक्रमात पाहावयास मिळाली. डॉ.सुजय विखे हे भाजपकडूनच खासदार होतील असे वक्तव्य करून आमदार कर्डिले यांनी विखेंकडे कटाक्ष टाकताच विखे यांनी देखील स्मितहास्य केल्याने उपस्थितांमध्ये चचेर्ला उधाण आले आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले डॉ.सुजय विखे यांनी आपल्या भाषणात मी वैयक्तिक कोणत्याही पक्षाचा नसून वडील कॉँग्रेस पक्षाकडून विरोधी पक्षनेते व आई जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा असल्याने मी देखील नाइलाजाने काँग्रेसचा मानला जात असल्याचे स्पष्ट केले

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत