सुधागडातील सरकारी कार्यालयात शुकशुकाट; सरकारी कामचारी संपावर!

पाली : विनोद भोईर

सरकार दरबारी पडून असलेल्या विविध मागण्यांची पुर्तता व्हावी याकरीता सुधागडातील राज्य सरकारी ,निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व ग्रामसेवक संघटीत झाले असून आपल्या न्याय हक्कासाठी ७,८,व ९ रोजी तीन दिवसाच्या लाक्षणिक संपाची हाक दिली असून आज दि.(७) ऑगस्ट रोजी त्यांनी सकाळी ११ वाजता पाली पंचायत समिती येथे जमून मग तिथून मोर्चाने पाली तहसील कार्यालया पर्यंत जाऊन तेथे निदर्शने करून सभा घेण्यात आली. त्यानंतर त्यांनी पाली तहसीलदार बी.एन.निंबाळकर यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. संपाचा सरकारी कामकाजावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाल्याने पाली तहसील कार्यालय, पंचायत समिती येथे पूर्णपणे शुकशुकाट दिसत होता.

कर्मचार्यांच्या मागण्या पुढीलप्रमाणे  सातवा वेतन आयोग मिळणे, अंशदायी पेन्शन योजना रदद करावी,कंत्राटीकरण बंद करावे , पाच दिवसांचा आठवडा यासह अन्य मागण्यांसाठी राज्यातील १९ लाख कर्मचारी ७, ८ आणि ९ ऑगस्ट ला तीन दिवसांचा लाक्षणिक संपा वर गेले आहेत यावेळी तालुका शाखा सरचिटणीस जावेद जमादार ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष मयूर कारखानीस,कोतवाल संघटनेचे जिल्हा अध्यक्ष हरीश देशमुख अादी पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरकारी कर्मचारी आणि शिक्षक यांच्या मागण्यां करिता या पूर्वी निदर्शने , निवेदने आणि एक दिवसांचा संप देखील करण्यात आला होता. तसेच जानेवारी व जुलै २०१७ ला संघटनेने तीन दिवसांचा संप जाहीर केला होता . मात्र या संपाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी संघटनेबरोबर चर्चा करून सर्व मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

परिणामी संघटनेने संप स्थगित केला .मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाला एक वर्ष होऊन देखील सरकार कडून अामच्या मागण्या बद्दल वेळकाढू धोरण अवलंबिले गेले. तसेच आंदोलनाची दखल न घेतल्याने नाईलाजाने संघटनेला संप करावा लागत असल्याचे संघटनेच्या पदाधिकारी म्हणाले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत