सुधागडात अंबा नदीला पूर! जांभूळपाडा पूल पाण्याखाली गेल्याने वाकण-खोपोली मार्गावरील वाहतूक ठप्प !

पाली : विनोद भोईर

सुधागडात पाऊसाने जोरदार सुरुवात केली असून शुक्रवार (दि.६) च्या रात्री पासून तालुक्यात सर्वत्र पाऊसाचा जोर कायम असून शनिवारी सकाळी ११ वाण्याच्या सुमारास तालुक्यातील अंबा व सरस्वती नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे या नदीवर असणारे पाली व जांभूळपाडा हे दोन्ही पूल पाण्याखाली गेल्याने वाकण-खोपोली मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून पाली व जांभूळपाडा येथील पुलापलीकडे वाहनांच्या लांबच लांब रंगा लगल्या आहेत. तर या मुसळधार पाउसामुळे तालुक्यात सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे.

सुधागडात अंबा नदीला पूर! जांभूळपाडा पूल पाण्याखाली गेल्याने वाकण-खोपोली मार्गावरील वाहतूक ठप्प !

पाली येथे सकाळी शाळा कॉलेजमध्ये व कामानिमित्त आलेल्या विद्यार्थी व नागरिक ठिकठिकाणी अडकून रहिल्याने त्यांचे खूपच हाल झाले. अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडताच सुरक्षितेच्या दृष्टीने तात्काळ पालीचे तहसीलदार बी.एन.निंबाळकर हे स्वता: जांभूळपाडा विभागातील पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरिता गेले तर पाली शहर परिसरात नायब तहसीलदार वैशाली काकडे या कार्यरत होत्या.पाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविद्र शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिसांनी जांभूळपाडा व पाली येथील दोन्ही पुलावरती पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत