सुधागडात ग्रामपंचायत निवडणुकीत शेकापची बाजी !

राष्ट्रवादी आणि भाजपला एका जागेवर समाधन

पाली : विनोद भोईर

सुधागड तालुक्यातील दुसऱ्या टप्प्यातील १४ ग्रामपंचायतिचे निकाल २८ मे रोजी पाली तहसील कार्यालय येथे जाहीर करण्यात आले. तालुक्यातील १४ ग्रामपंचायती मध्ये १४ पैकी नांदगाव व गोमाशी या दोन्ही ग्रामपंचायती शेकापने  बिनविरोध केल्या  तर पाली ग्रामपंचायतीवर बहिष्कार टाकला असल्याने तिथे कुठल्या प्रकारचा निकाल देण्यात आला नाही.

तर उर्वरित ११ पंचायती मध्ये रासळ शेकाप, राबगाव शेकाप, पाचापूर शेकाप, महागाव शेकाप, कळंब महाआघाडी, नाडसूर ग्रामविकास आघाडी, जांभूळपाडा भाजपा, भार्जे राष्ट्रवादी, दहिगाव आघाडी, परळी महाआघाडी, नवघर राष्ट्रवादी शेकाप आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार निवडून आले. यामध्ये शेतकरी कामगार पक्षाने बाजी मारली असून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हे आपला गड राखण्यात अपयशी ठरले. तर जांभूळपाडा  ग्रामपंचायती मध्ये भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष गणेश कानडे यांनी आपल्या पत्नीला निवडून आणून भाजपाचे वर्चस्वव सिध्द केले आहे. तर यानिवडणुकीत राष्ट्रवादीला फक्त एकाच ग्रामपंचायतीवर  सरपंच निवडणूक आणून समाधान मानाव लागल आहे . तसेच शेकापचा  बालेकिल्ला असणारी नाडसूर ग्रामपंचायतीवर एका नवनिर्वाचित कार्यकर्त्याने ग्रामविकास आघाडीचा  झेंडा फडकविला आहे,

सुधागडात झालेल्या दुसऱ्या टप्यातील १३ ग्रामपंचायतिच्या निवडणुकी मध्ये शेतकरी कामगार पक्षाने  बाजी मारिली असून, मागील झालेल्या १४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपेक्षा आत्ता मात्र राष्ट्रवादी पक्षाची पीछेहाट झालेली दिसत आहे .  

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत