सुधागडात शेकाप, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाला खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश!

पाली : विनोद भोईर

पाली शहर स्वच्छ व सर्वांगीसुंदर बनविण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांना मुलभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी पाली नगरपंचायत होणे गरजेचे आहे. पालीच्या नागरिकांची देखील हिच इच्छा आहे. पाली नगरपंचायत झाल्यास पाली नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकणार असा विश्वास केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी व्यक्त केला. झाप येथील शुभमंगल कार्यालयात नुकत्याच झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात अनंत गिते बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे पालीचे माजी शहर उपाध्यक्ष अनुपम कुलकर्णी तसेच त्यांच्या अनुपमदादा मित्रमंडळाच्या सुमारे चारशे सदस्यांसह सुधागड तालुक्यातील पाली पंचायत समिती माजी सभापती दिपाली बेलोसे, अनुपम मित्र मंडळाचे अध्यक्ष संदेश सोनकर, नथुराम बेलोसे, आगरी समाजाचे महेश खंडागळे, वैभव जोशी, भाऊ मोहिते, रितेश मिसाळ, दीपक कोलबेकर, संदीप परब, अभिजित सावंत, मुजफ्फर बशीर महाडकर, अखिल महाडकर, किरण चव्हाण, स्वप्नील भुरे, अमोल कुंभार, महेंद्र थळे, विक्रम मिनीडोअर संघटनेचे अध्यक्ष मंगेश भगत, मालवाहतूक संघटनेचे अध्यक्ष किरण भगत यांचेसह हजारो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी बोलतांना ना.गीते म्हणाले की महाराष्ट्रातील इतर राजकीय पक्षामध्ये शंभर टक्के राजकारण चालते व ते झोपेतही राजकारणाची स्वप्ने बघत असतात परंतु 80 टक्के समाजकारण करणारी शिवसेना गल्लीतून दिल्लीत पोहचली मात्र ज्यांनी आयुष्यभर राजकारण केले त्यांना समाजकारण कळले नाही म्हणून त्यांना आता दिल्लीतून गल्लीत बसावे लागले असा टोला  केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना कोणाच नाव न घेता लगावला. 

यावेळी अनुपम कुलकर्णी यांनी सांगितले की पाली नगरपंचायतीचा नगराध्यक्ष बनण्याची संधी शिवसेना पक्षाकडून दिल्यास या पदाला न्याय देईन. पालीचा सर्वांगिण विकास व समाजपयोगी कामे करण्याच्या निस्वार्थी हेतूने शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई म्हणाले की लोकांना वापरुन घेणे व स्वतः सत्तेच्या खुर्च्यांवर बसणे, व कार्यकर्त्यांना केवळ कार्यकर्ताच ठेवणे हे काम राष्ट्रवादी करते.  कोट्यावधी रुपये खर्च करुन तटकरेंचा पराभव होतो तर दुसर्‍या बाजूला कुठलाही खर्च न करता मतांनी शिवसेनेची पेटी भरते व निवडणुक जिंकली जाते . यावेळी किशोर जैन म्हणाले की सत्तेच्या राजकारणात पाली नगरपंचायत खोळंबली  परंतू आता शिवसेनेच्या पुढाकाराने पालीला नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त होईल.

कार्यक्रमास अनंत गिते यांच्यासह शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई, शिवसेना जि.प सदस्य किशोर जैन, जि.प सदस्य रविद्र देशमुख, शिवसेना सुधागड तालुका प्रमुख मिलिंद देशमुख, रोहा तालुका प्रमुख समिर शेडगे,माणगाव तालुका प्रमुख अनिल नवगणे, पंचायत समिती उपसभापती उज्वला देसाई, सोनाली मढवी,  पं.स सदस्य नंदू सुतार, रविंद्र खंडागळे, सचिन जवके, संदीप दपके, आपटवणे सरपंच शरद चोरघे,  संदीप खरिवले, नाडसूर सरपंच उज्वला पवार, दहिगाव सरपंच  सुषमा देशमुख, आदिंसह शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थीत होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत