सुधागडात सकल मराठा समाजाच्या महामोर्चाने पाली दणाणली!

  • तहसील कार्यालयासमोर चार हजार लोकांचा ठीय्या आंदोलन !  
  • पाली, परळी, पेडली, जांभूळपाडा बाजारपेठेत कडकडीत बंद !

पाली : विनोद भोईर

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी संपूर्ण राज्य व देशभरात व्यापक स्वरूपाचे आंदोलन उभारले जात आहे अनेक वर्ष रस्त्यावरच्या लढाई सह संविधानिक मार्गाने शासनदरबारी निवेदने सादर करून मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आग्रही मागणी केली जात आहे. परंतु आजतागायत मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही. सरकारने केवळ आश्वासने देऊन समाजाची दिशाभूल केली. त्यांमुळे मराठा समाजात असंतोषाची लाट पसरली असून लवकरात लवकर आरक्षण मिळावे याकरिता सुधागड तालुका सकल मराठा क्रांती च्या वतीने आरक्षण व इतर मागण्यासाठी गुरुवार(ता.९)अॉगस्ट२०१८ रोजी सकाळी 11 वाजल्यापासून मराठा समाज भवन ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या पुष्पहार अर्पण या ठोक मोर्चाची सुरुवात केली.चार ते पाच हजार लोकांची भव्य अशी रॅली काढण्यात आली.मराठा समाजाच्या वतीने सुधागड-पाली तहसिलदा बी.एन.निंबाळकर निवेदन देण्यात आले.  

एक मराठा लाख मराठा या जयघोषाने संपूर्ण पाली शहर दणदनले होते. हा भव्यदिव्य मोर्चा तहसील कार्यालयासमोर ठिया आंदोलन  करण्यात आले. या मराठा समाजाच्या ठोक मोर्चाला  मुस्लिम समाजाचाही पाठिंबा मिळाला आहे. तसेच सुधागड तालुका बौध्द पंचायत,शेतकरी संघटना ,सुधागड तालुक्यातील सर्वस्तरातून पाठींबा देण्यात आले.

महाराष्ट्र शासन मराठा समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत या ठोक मोर्चाला  सुरवात झाली. या आंदोलनात सुधागडातील खेड्यापाड्यातील तरुण थोर,महीलावर्ग मोठ्या संख्येने मराठा समाजातील   मोठ्या संंख्येने  उपस्थित आहे. या आंदोलनास सुधागड मुस्लिम समाजाच्या नागरीकानी एकत्रित येऊन जाहीर पाठिंब्याचे पत्र  दिले.व शरबतचे वाटप केले. तसेच पालीतील व्यापारी ,मिनीडोर,छोडेमोठे दुकांदार,हॉटेल ,अदोलनाच्या अनुषंगाने बस सेवा ही बंद होती. यावेळी पावसाची भूरभूर सुरु असून ही मराठा समाजाच्या अंदोलन हा सुरु होते.पोलिस प्रशासनाने योग्य ते बंदोबस्त करुन चांगल्या प्रकारे सहकार्य केले.

यावेळी मराठा समाज समन्वय समिती अध्यक्ष शरद गोळे, मराठा समाजा अध्यक्ष गणपत सितापराव सुधागड-पाली पचायतसमिती सभापती  साक्षीताई दिघे,माजी.सभापती भारती शेळके ,ताराराणी बिग्रेटप्रदेशध्यक्षा वंदनाताई मोरे, निहारीका शिर्के , जीवन साजेकर, दादू गोळे,शरद चोरघे,रमेश खैरे,मिलिंद देशमुख , ,गणेश देशमुख ,नितीन यादव,अशिष यादव, वैभव तळेकर , निलेश शिर्के, पोंगडे महाराज आदी उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत