सुधागड एज्युकेशनच्या विरोधात प्रकाश देसाई आक्रमक

फी वाढ आणि देणगी शुल्काविरोधात प्रकाश देसाई यांचा आमरण उपोषणाचा इशारा

पाली : विनोद भोईर 

सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या पाली येथील शाळेच्या अन्यायकारक फी वाढ आणि देणगी शुल्क विरोधात आमरण उपोषण करण्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश देसाई यांनी दिला आहे. याबाबतची माहिती त्यांनी एका पत्रकार परिषदेद्वारे दिली .सुधागड तालुक्यात सुधागड एज्युकेशन सोसायटीची ग.बा.वडेर हि मोठी शाळा आहे. शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये यांनी सुधागड एज्युकेशन सोसायटीची मुहूर्तमेढ याच शाळेतून रोवली.

मात्र अलीकडे संस्थाचालकांनी संस्थेच्या मूळ उद्देशांना बगल देत हि लयलूट चालविली आहे. संस्थेच्या पनवेल,कळंबोली आदी शाळा आणि महाविद्यालयात देखील अन्यायकारक फी वाढ, देणगी शुल्क वसुली मोठ्या प्रमाणात सुरु आहे. संस्थेच्या या कारभाराविरोधात आपण नेहमीच आवाज उठविला असून पाली आणि परिसरातील गोरगरीब विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क अबाधित रहावा यासाठी हे आंदोलनाचे पाऊल उचलले असल्याचे प्रकाश देसाई यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले. यातून संस्थेने आपल्या कामकाजाच्या पद्धतीत बदल केला नाही तर शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. एकूणच एन पाली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश देसाई यांनी केली हि घोषणा खरंच विध्यार्थी आणि पालक यांच्या हितासाठी आहे कि हा निव्वळ निवडणुकीसाठी केलेला स्टंट आहे हे आगामी काळात स्पष्ट होईल .

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.