सुधागड प्रेस क्लबच्या वतीने कृष्णा देशमुख व प्रकाश गायकवाड या शेतकऱ्यांचा सन्मान

 पाली : विनोद भोईर

रायगड प्रेस क्लब व सुधागड प्रेस क्लबच्या सयुक्तविद्यमाने दरवर्षी तालुक्यातील दोन प्रगतशील शेतकऱ्यांना त्यांचे शेताच्या बांधावर जाऊन सन्मानित करण्यात येते त्यानुसार यावर्षी सुधागड तालुक्यातील कोलतरे गावचे प्रगतीशील शेतकरी कृष्णा तात्याबा देशमुख व नांदगाव विभागातील प्रकाश गायकवाड यांना यावर्षीचा आदर्श शेतकरी पुरस्कार नुकताच मान्यवराचे हस्ते त्यांचे शेताचे बांधावर जाऊन देण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप सन्मान पत्र, शाल, पुष्प गुच्छ व झाडांची रोपे असे होते .

  बळीराजाचा एकाच दिवशी संपूर्ण रायगड जिल्ह्यात सन्मान करणारी रायगड प्रेस क्लब ही एकमेव संघटना असून . यावर्षी सुधागड तालुक्यातून दोन प्रयोगशील शेतकरी निवडण्यात आले . त्या मध्ये तालुक्यातील कोलतरे गावचे प्रगतीशील शेतकरी कृष्णा तात्याबा देशमुख व नांदगाव विभागातील प्रकाश गायकवाड यांना सुधागड प्रेस क्लबच्या वतीने सन्मानित करण्यात आले . यावेळी  सुधागड प्रेस क्लबचे अध्यक्ष विनोद भोईर , उपाध्यक्ष संतोष उतेकर, विभागीय सदस्य मंगेश यादव , सचिव अमित गायकवाड , खजिनदार परेश शिंदे, बाळा यादव, प्रशांत हिगणे, अशोक मोरे आदीसह सुधागड प्रेस क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत