सुनिता परमार पाकिस्तानातील निवडणुकीत उमेदवार

 

रायगड माझा वृत्त

कराची – पाकिस्तानात राहणाऱ्या सुनीता परमार नावाच्या हिंदु महिलेने तेथील प्रांतिक ऍसेम्ब्लीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करून वेगळाच विक्रम केला आहे. येत्या 25 जुलैला ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज करणाऱ्या त्या पहिल्याच हिंदु महिला आहेत. थरपारकर जिल्ह्यातील मतदार संघातून त्या अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हिंदु नागरीक वास्तव्याला आहेत.

31 वर्षीय सुनिता यांनी नागरीकांना चांगला सोयी सुविधा देण्याच्या मुद्‌द्‌यावरून ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या म्हणाल्या की आज जग 21 व्या शतकात आहे पण आमच्या या भागात किमान आवश्‍यक नागरीसुविधाही उपलब्ध नाहीत हे दुर्देव आहे. या निवडणुकीत आपण विजयी होऊ असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला आहे. निवडून आल्यावर आपण मुलींचे शिक्षण आणि महिलांचे आरोग्य या विषयावर लक्ष केंद्रीत करणार आहोत असे, त्यांनी सांगितले.

थरपारकर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 16 लाख इतकी असून त्यातील निम्मी हिंदु आहे. या आधी कृष्णकुमारी कोहली या हिंदु महिला उमेदवार राष्ट्रीय ऍसेम्ब्ली वर नियुक्त झाल्या होत्या. त्यांना पाकिस्तान पिपल्स पार्टीने नामांकित केले होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत