सुपरस्टार रजनीकांत आणि तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना धमकी

रायगड माझा ऑनलाईन । चेन्नई

Palaniswami Rajinikanth Residences Bomb Hoax - Sakshiदाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांना त्यांचं घर बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच एका अज्ञात व्यक्तीने रजनीकांत यांच्यासह तामीळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनाही त्यांचं घर उडवण्याची धमकी दिली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वत:च पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे. एएनआईने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी ५ मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने फोन करून पोलिसांना मुख्यमंत्र्याचं घर उडवून देण्यासाठी कट रचल्याची माहिती दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकीचा फोन येताच तातडीने मुख्यमंत्री राहत असलेल्या निवासस्थानी बॉम्बशोधक पथक पाठवण्यात आले. मात्र अद्याप तिथे कोणताही बॉम्ब सापडला नाही. तसेच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी असलेल्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. त्याच दिवशी संध्याकाळी साधारण साडे सहाच्या सुमारास पुन्हा एकदा त्याच नंबरवरून एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांना फोन करून सुपरस्टार रजनीकांत यांचं घर बॉम्बच्या साहाय्याने उडवण्याची धमकी दिली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीने दिलेल्या धमकीचं गांभीर्य लक्षात घेऊन या संपूर्ण प्रकरणाचा वेगाने तपास करायला सुरुवात केली. तसेच ज्या नंबरवरून पोलिसांना फोन आला तो नंबरही ट्रेस करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत