सुपारी अडकली जागेच्या ‘अडीकत्यात’! श्रीवर्धनमधील राज्याच्या सुपारी संशोधन केंद्राला जागेची चणचण, प्रयोग करण्यास अडचणी!

श्रीवर्धन : श्रीकांत शेलार

महाराष्ट्र राज्यातील सुपारी संशोधन केंद्र रायगड मधील श्रीवर्धन येथे आहे. मात्र अपूर्या जागे मुळे येथील सुपारी व त्यातील आंतरपिके संशोधनाला वाव मिळत नाही. विशेष म्हणजे सन 2003 पासून जागेचा शोध सुरु आहे.

या केंद्राची स्थापना जून 1953 साली झाली आहे. सद्यास्थितीत श्रीवर्धन मधील सुपारी केंद्र हे 43 गुंठे जमिनीवर व्याप्त आहे. नारळ, सुपारी ही महत्वाची पिके व त्यावर संशोधन केले जाते. याशिवाय जायफळ, दालचिन व काळीमिरी तसेच अननस, हळद, आले आणि सुरण यांसारखी आंतरपिके यांवर प्रयोग केले जातात. वर्षाला साधारण सहा हजार सुपारीचे रोपटे, तीन हजार नारळाची रोपे यांची विक्री शासकीय दराने होते. श्रीवर्धनी प्रकारच्या सुपारीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.सुपारी पिकांवर सूक्ष्म अन्नद्रव्यांचा परिणाम अभ्यासणे, कंदपिके व आंतरपिके अभ्यास, खतांच्या गोळ्याचा सुपारी पिकांवर होणारे परिणाम याचा अभ्यास अशी प्रयोग सुपारी संशोधन केंद्रात सुरु आहेत. जागे अभावी इच्छा असून नवे प्रयोग, प्रात्यक्षिक व संकरित लागवड करणार कशी असा प्रश्न आम्हाला पडतो. गेली तेरा वर्ष जमीन मिळावण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे केंद्रातील प्रभारी अधिकारी सलीम महालदार  यांनी ‘प्रतिनिधी’ शी बोलताना सांगितले.दिवेआगर येथे प्रस्तावित जागा.

सुरुवातीला है केंद्र केंद्र सरकारच्या ताब्यात होते. दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ संलग्न असलेले श्रीवर्धन येथील सुपारी संशोधन केंद्रासाठी दिवेआगर येथील पाच एकर जागा प्रस्तावित  होती. गतवर्षी तत्कालीन तहसीलदार तहसिलदार सुरेश काशिद यांच्या मार्फत जागेची मोजणी झाली होती. मात्र जागे बाबत स्थानिक वाद असल्याने तेथे संशोधन केंद्र बनणयाबाबत साशंकता आहे.सुपारी संशोधन केंद्रात कमी खर्चात अधिक उत्पन्न देणाऱ्या प्रजाती विकसित होणे गरजेचे आहे. श्रीवर्धन येथे उच्चशिक्षित व तांत्रिक ज्ञान असणारी व्यक्ति उपलब्ध असल्याची फायद्याचे ठरेल.

श्रीवर्धनलाच हे सुपारी केंद्र का ?

 श्रीवर्धन भागातील स्थानिक सुपारी जातींमधून ‘श्रीवर्धनी रोटा’ पद्धत ही जात 1998 मध्ये केंद्रा कडून विकसित केली गेली. तिच्यात पांढऱ्या गऱ्याचे प्रमाण अधिक असून मऊ असते. संशोधनास पोषक वातावरण व सुपिक जमीन यांमुळे संशोधन केंद्र श्रीवर्धन येथे 1953 साली स्थापन केले गेले.  सुपारी पिकांवरील विविध रोग, कोकणातील बागांचे सर्वेक्षण करून विविध जातींचा संग्रह व अभ्यास करणे, अधिक उत्पन्न देणाऱ्या जातींचा अभ्यास करणे तसेच रोपे शेतकऱ्यांना पुरवणे ही प्रमुख उद्दिष्ट आहेत.

सुपारी संशोधन केंद्र दिवेआगरला होण्यासाठी प्रमुख्याने आपण मागणी केली असुन जिल्हाअधिकारी कार्यालयाकडुन मंजुरी मिळाली असुन सदर जागेची मोजणी सुध्दा करण्यात आली आहे. : 

उदय बापट, सरपंच दिवेआगर 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत