सुरक्षा दलांकडून एका दहशतवाद्याचा खात्मा; चकमक सुरू

श्रीनगर : रायगड माझा वृत्त

पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने नुकत्याच केलेल्या हल्ल्यात ४० भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारतीय सुरक्षा दलांनी काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. आज (दि.22) सकाळपासून बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांवर कारवाई सुरू केली आहे. यात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश आले असून वारपोरा येथे चकमक सुरूच आहे.

भारतीय सुरक्षा दलांना सोपोर परिसरात दहशवादी लपल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सैन्याने शोधमोहीम सुरू केली. दरम्यान, सुरक्षा दलांनी घेरल्याचे लक्षात येताच दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्याला भारतीय सैन्यानेही चोख प्रत्युत्तर देत एका दहशतवाद्याला टिपले. चकमक अद्याप सुरूच आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत