सुरक्षा पट्टीला धडकून सोमाटणे फाटा येथे कारचा अपघात!

चिंचवड : रायगड माझा वृत्त 

सुरक्षा पट्टीला धडकून सोमाटणे फाटा येथे कारचा अपघात

पुणे मुंबई महामार्गवरील अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे. महामार्गाच्या बाहेरील बाजूने वाहनांनी मध्येच अवैध प्रवेश करु नये यासाठी रस्त्याच्या बाजूने सुरक्षा पट्टी लावण्यात आलेली आहे. या सुरक्षा पट्टीलाच धडकून  आज पहाटे सोमाटणे फाटा येथील पुलाजवळ कारला अपघात झाला. 

पुण्याहून मुंबईला जाताना सोमाटणे फाटा पुलाजवळ हा अपघात झाला. या अपघातात रस्त्याच्या कडेला असलेली स्टीलची पट्टी गाडीच्या आरपार गेली.  या भीषण अपघात कारमधील तिघेजण गंभीर जखमी झाले. तर एकजण किरकोळ जखमी झाला आहे. जखमींवर जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अमोल शिवाजी पाटील (वय 39) श्रीमंत कृष्णा भोंदे (वय 45) आणि प्रकाश गोविंद वाईगडे (वय 45), सर्व रा. सिल्व्हर पार्क, मीरा भाईंदर हे गंभीर जखमी झाले आहेत तर सूर्याजी कृष्णा भोंदे चालक, (वय 39), रा. सिल्व्हर पार्क, मीरा भाईंदर यांना किरकोळ जखम झाली आहे. तळेगाव पोलीस घटनास्थळी दाखल असून पुढील तपास करीत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत