सुरेश टोकरे करणार शिवतीर्थसमोर उपोषण!

जिल्हा परिषद नेरळ प्राधिकरणाच्या मनमानी कारभारा विरोधात सुरेश टोकरे आक्रमक 

नेरळ : कांता हाबळे

सुरेश टोकरे हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद आणि नेरळ प्राधिकरणाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी नेरळच्या विकासाठी आणला आहे. परंतु नेरळ जिल्हा परिषद शाळा, नेरळ घनकचरा प्रकल्प, नेरळ व्यापारी संकुल अशी कामे अर्धवट ठेवली आहेत. याबाबत जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्या पाठपुरावा करत नसल्याने नेरळच्या विकासाला खीळ बसली आहे. तसेच नेरळ प्राधिकरण याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सुरेश टोकरे यांनी केला आहे. नेरळच्या प्रश्नाबाबत रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे आक्रमक झाले असून त्यांनी लवकर जिल्हा परिषदेच्या शिवतीर्थ इमारती समोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. 
नेरळच्या विकासाठी नेरळ प्राधिकरणाकडे कोट्यवधी रुपयांचा निधी पडून आहे. परंतु नेरळमधील घनकचरा प्रकल्प, व्यापारी संकुल आणि नेरळ जिल्हा परिषद शाळा यासाठी कार्यादेश काढत नसल्याने ही कामे प्रलंबित राहिली असल्याचा आरोप सुरेश टोकरे यांनी केला आहे. नेरळमध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नविन कामे करण्यात आली नाहीत. जी कामे मंजूर होती ती कामेही बंद झाली असल्याची खंत सुरेश टोकरे टोकरे यांनी व्यक्त केली आहेत. नेरळच्या घनकचरा प्रकल्प देखील जिल्हा परिषदेकडून सुरू करण्यात आला नाही , त्यामुळे नेरळ शहरात कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.  तसेच नेरळ च्या कुंभारआळी शाळेचे झालेले 16 वर्ग खोल्यांचे टेंडरही रद्द झाले असून  चौकशी समितीच्या फेऱ्यात अडकून पडली आहे.
त्यामुळे नेरळच्या विद्यार्थ्यांना चिखलातून ये- करावी लागत आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची काळजी प्रशासनाला नसल्याचे यावरून दिसून येत आहे. या सर्व कामांवर विद्यमान सदस्यांनी लक्ष देवून थांबलेले काम पूर्ण करण्याची अपेक्षा होती, मात्र तसे काही होतांना दिसत नाही. जिल्हा परिषदेच्या निवडणूक होऊन आता सव्वा वर्ष झाला तरी या कामाकडे गांभीर्याने पहिले जात नसल्याचा आरोप सुरेश टोकारेंनी केला आहे. नेरळ प्राधिकरण आणि जिल्हा परिषद याकडे जाणीवपूर्वक लक्ष देत नसल्याचा आरोप करत नेरळ शहरातील रखडलेल्या कामांसाठी सुरेश टोकरे यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. ते स्वतः जिल्हा परिषद प्राधिकरणाच्या विरोधात लवकर उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केले आहे.
रायगड जिल्हा परिषद, नेरळ प्राधिकरण यांनी नेरळ शहरातील मंजूर झालेल्या कामांची अद्याप वर्कओडर काढली नसल्याने ही कामे आद्यप सुरू करण्यात आली नाही. विद्यमान जिल्हा परिषद सदस्या याकडे लक्ष देत नसून जिल्हा परिषदेकडून देखील याची दखल घेतली जात नाही. यामुळे नेरळच्या विकास खुंटला आहे. त्यामुळे मी स्वतः नेरळच्या विकासाठी जिल्हा परिषदेच्या शिवतीर्थ इमारती समोर लवकर उपोषणाला बसणार आहे. 
– सुरेश टोकरे, माजी अध्यक्ष, रा. जि. प..
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत