सुरेश धस विजयी! उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणूक

उस्मानाबाद : रायगड माझा वृत्त 

उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी विजय मिळवला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांचा पराभव झाला आहे. धस यांचा विजय राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना जोरदार धक्का मानला जातो आहे. सुरेश धस यांनी अशोक जगदाळे यांच्यावर 74 मतांनी मात केली आहे.

भाजपचे उमेदवार सुरेश धस यांना 526 मतं, राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांना 452 मतं मिळाली. नोटाला एक मत, तर 25 मतं बाद ठरली. सांकेतिक आकडे लिहिलेले असल्यानं 25 मंत बाद झाल्याची माहिती मिळते आहे. सुरेश धस आणि पराभूत उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात मतांवरुन वाद झाला आहे. अशोक जगदाळे यांनी फेरमतमोजणीची मागणी केली आहे.

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या व राज्याच्या महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ही निवडणूक प्रचंड प्रतिष्ठेची केली होती. यात पंकजा मुंडे यांनी बाजी मारली असून, धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे.

चुरशीची निवडणूक

लातूर-उस्मानाबाद-बीडच्या जागेसाठीची निवडणूक सर्वात चुरशीची मानली जात होती. कारण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषेदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची केली होती. या मतदारसंघात भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात लढत होत होते. राष्ट्रवादीने रमेश कराड यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने, राष्ट्रवादीची आणि पर्यायाने धनंजय मुंडेंची चांगलीच पंचाईत झाली होती. त्यामुळे राष्ट्रवादीला ऐनवेळी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अशोक जगदाळे  यांना पाठिंबा द्यावा लागला होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत