सुरेश रैना सह ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल; मुंबईत नाईट क्लबवर पोलिसांचा छापा

मुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त 

मुंबई पोलिसांचा नाईट क्लबवर छापा, सुरेश रैनासह अनेक सेलिब्रिटींवर गुन्हा  दाखल

कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी माजी क्रिकेटर सुरेश रैना याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील ड्रॅगन फ्लाय नावाच्या क्लबमध्ये पार्टी सुरू होती. या पार्टीत सुरेश रैना, गायक गुरू रंधावा आणि अभिनेता ह्रतिक रोशनची पत्नी सुझेन खान तसंच इतर काही सेलिब्रेटींवसह एकूण ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

गावदेवी पोलिसांच्या पथकाने या क्लबवर पहाटे 2.30  वाजेच्या सुमारास छापा टाकला. यावेळी मास्क, सोशल डिस्टंसिंगचे पालन न करण्यात आल्याचे समोर आले. पोलिसांनी या कारवाईत 34 जणांना ताब्यात घेतले आहे.  मुंबई पोलिसांकडून क्लबच्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान काही जण मागील दरवाजातून पळून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी सुरेश रैना याच्याविरोधात कलम 188 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत