सुशीलकुमारांना डावल्याने काँग्रेस समर्थकांची निदर्शने

सोलापूर :रायगड माझा 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या सर्वोच्च काँग्रेस कार्यसमितीची घोषणा नुकतीच केली. यात २३ ज्येष्ठ नेत्यांना सहभागी करुन घेण्यात आले आहे. मात्र, माजी केंद्रीय गृहमंत्री व सोलापूरचे सुपुत्र सुशिलकुमार शिंदे यांना या कार्यकारिणीतून वगळण्यात आल्यामुळे सोलापुरातील शिंदे समर्थकांनी काँग्रेस भवनासमोर गुरुवारी निर्दशने केली.

यावेळी शहर व जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. काही नाराज समर्थकांनी यावेळी गोंधळ घालून सर्वांचे लक्ष वेधुन घेतले.

राहुल गांधी यांची टीम खूप चांगली : सुशिलकुमार शिंदे

काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अशोक गेहलोत यांनी मंगळवारी पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. या कार्यकारिणीत दिग्विजयसिंह, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह काही ज्येष्ठांना वगळण्यात आले आहे. याकडे शिंदे यांचे लक्ष वेधले असता ‘नो कॉमेंटस्’  एवढीच प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. त्यानंतर या अनौपचारिक गप्पांमध्ये पक्षाने आपल्याला खूप दिले आहे. आता काहीही अपेक्षा नाही. राहुल गांधी यांची टीम खूप चांगली असून आगामी काळात या टीमकडून मोठ्या अपेक्षा असल्याचे मत त्यांनी नोंदवले होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत