सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या पेण शाखेला आग : लाखोंची हानी

पेण : सुनील पाटील

पेण शहरातील रायगड बाजार इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या पेण शाखेला शुक्रवारी पहाटे ५  च्या दरम्यान अचानक आग लागून लााखो रुपयाची हानी झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. सदर आगीचे निश्चित कारण समजू शकले नसलेतरी सदर आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की पेण धरमतर रोडवरील रायगड बाजार इमारतीच्या तळमजल्यावर सेंट्रल बँक ऑफ इंडियाची पेण शाखा कार्यालय व लगतच बँकेचे एटीएम सेंटर आहे. आज पहाटे सकाळी ५ च्या दरम्यान बँक बंद असताना बँकेच्या शटर मधून धुराचे प्रचंड लोट बाहेर पडत होते. यावरून सदर बँकेला आग लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर सुज्ञ नागरिकांनी पोलीस स्टेशनला कळविले. पोलिसांनी तात्काळ दखल घेतली व  घटनास्थळी धाव घेऊन पेण नगरपालिकेच्या व JSW कंपनीच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. दोन्ही अग्निशमन दलाच्या जवानांनी 2 ते अडीच तास प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. त्यामुळे सुदैवाने बँकेच्या शेजारी असलेली सांगली वैभव सहकारी क्रेडिट सोसायटी व इतर दुकानांना आगीची झळ बसली नाही. मात्र सदरच्या आगीत बँकेचे फर्निचर, कॉम्प्युटर, स्टेशनरी, एटीएम केंद्र, जळून खाक झाले आहे. यामुळे बँकेला लाखो रुपयांचा आर्थिक नुकसानीचा फटका बसला आहे. या आगीमुळ बँकेचे बंद झाले आहे.

सदरची इमारत ही फार जुनी असल्याने व्यापारी संकुलातील पहिला व दुसरा मजला पूर्णपणे यापूर्वीच रिकामा करण्यात आला आहे. सदरची इमारत गळकी असल्याने शॉर्टसर्किट झाल्याची चर्चा पेण शहरात सुरू आहे

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत