सेक्रेड गेम्समधील बंटीला चित्रपटाची लॉटरी

मुंबई : रायगड माझा ऑनलाईन 

सेक्रेड गेम्समधील बंटी उर्फ जतीन सरना याला बॉलिवूडमध्ये चित्रपटाची संधी मिळाली आहे. भारताने 1983 साली विश्वचषक जिंकला होता. त्यावरच आधारित असलेला 83 हा सिनेमा कबीर खान दिग्दर्शित करत आहे. रणवीर सिंगची या चित्रपटात प्रमुख भुमिका असून कपिल देवची व्यक्तिरेखा तो साकारणार आहे.

या चित्रपटात जतीन सरनाचीही निवड झाली आहे. रवि शास्त्रीची भुमिक धैर्य कर्वा साकरणार आहे. तर रॉजर बिन्नीची भुमिका विजय वर्मा साकारणार आहे. यशपाल शर्मा यांची भुमिका जतीन सरना वठवणार आहे. सेक्रेड गेम्समधील बंटी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. सेक्रेड गेम्सच्या दुसर्‍या पर्वातील त्याचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. त्यात त्याला बॉलिवूडमध्ये चित्रपटाची संधी मिळाल्याने त्याच्या फॅन्समध्ये आनंदाचे वातावरण आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत