सेल! शाओमीच्या नोट ६ प्रोवर आकर्षक सवलत

मुंबई : रायगड माझा वृत्त 

Related image
शाओमीचा नोट ६ प्रो ची एका दिवसाची सेल काल भारतात आयोजित करण्यात आली होती. ग्राहकांचा सहभाग पाहता आज पु्न्हा एकदाही सेल आयोजित करण्यात आली आहे.

४ जीबी रॅम आणि ६ जीबी रॅम अशा दोन व्हेरिअंटमध्ये हा फोन सध्या भारतात उपलब्ध आहे. ४ जीबी रॅम असलेल्या मॉडेलची किंमत १२,९९९ आहे तर ६ जीबी रॅम असलेल्या मॉडेलची किंमत १४,९९९ आहे. या दोनही फोनवर १००० रुपयांची सवलत देण्यात आली आहे. अॅक्सीक क्रेडिट कार्डवरून विकत घेणाऱ्यांना अजून ५ टक्के सवलत देण्यात येईल. खरंतर ही सेल २२ नोव्हेंबरला जाहीर करण्यात आली होती. पण ग्राहकांचा प्रतिसाद पाहता या सेलचा एक दिवस वाढवण्यात आला आहे. त्यामुळे ज्यांना हा फोन विकत घ्यायचा असेल त्यांनी लवकरात लवकर तो विकत घ्यावा

नोट ६ प्रोचे फिचर्स 

– ६.२६ इंच फुल एचडी+ डिस्प्ले
– १.८ गीगीहर्टझ ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन प्रोसेसर
-४ जीबी आणि ६ जीबी अशा दोन प्रकारांमध्ये उपलब्ध
-१२ मेगीपिक्सेलचा प्रायमरी सेन्सर आणि ५ मेगापिक्सेलचा सेकंडरी सेंसर आहे.
-४००० एमएएचची बॅटरी

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत