सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहात तर मग ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे.

Related image

( रायगड माझा ऑनलाईन टीम )

नवी दिल्ली : सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहात तर मग ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे.

लग्नसराईचा काळ सुरु झाला असतानाच आता सोनं-चांदीच्या किमतीत वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे.

सोमवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या दरात २०० रुपयांनी वाढ झाली आहे. ही दरवाढ म्हणजे गेल्या तीन महिन्यांतील उच्चांक ठरला आहे.

सोन्याच्या दरात वाढ
दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत २०० रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे आता १० ग्रॅम सोन्याचा दर ३०,९५० रुपयांवर पोहोचला आहे.

चांदीचा दर ४० हजारी पार 
सोन्याच्या दरात वाढ झाली असताना चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीच्या दरात ३०० रुपयांनी वाढ झाली त्यामुळे चांदीचा दर ४०,९०० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर सिंगापूरमध्ये सोन्याच्या दरात ०.४२ टक्क्यांची वाढ होत ते १,३४३ डॉलर प्रति औंसवर पोहोचले. तर, चांदीच्या दरात ०.९० टक्क्यांनी वाढ होत १७.३६ डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत