“सोनिया, देवेगौडा आणि मी विरोधकांना एकत्र आणू शकतो”-शरद पवार

मुंबई : रायगड माझा वृत्त 

भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाहीविरोधात देशभरातील विरोधकांची मोट बांधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा सक्रिय झाले आहेत. यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि मी २०१९मध्ये सर्व विरोधकांना एकत्र आणू शकतो, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
शरद पवार यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत देशातील सध्याची राजकीय परिस्थिती, विरोधी ऐक्य आदी मुद्द्यांवर भाष्य केलं. देशभरातील विरोधी पक्षांनी राज्यातील आघाड्या आणि २०१९मधील लोकसभा निवडणुकांसाठी राष्ट्रीय चेहरा कोण असेल? यावर लक्ष केंद्रीत करावं, असा सल्लाही पवार यांनी दिला. सोनिया आणि देवेगौडा हे विरोधकांची मोट बांधण्यासाठी मला मदत करतील. कारण माझ्याप्रमाणे त्यांनाही पंतप्रधानपदाची महत्वाकांक्षा नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी पवार यांनी मोदींवर निशाणा साधला. मोदींनीही माध्यमे, सरकार आणि सरकारच्या यंत्रणांवर नियंत्रण ठेवलं आहे, असं ते म्हणाले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत