सोलापूरच्या चार कन्या बनल्या हवाई सुंदरी

सोलापूर : रायगड माझा वृत्त 

solapur.

चीनी भाषा वर्गातील प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सोलापुरातील चार कन्यांची हवाई सुंदरी पदासाठी निवड झाली. या चारही कन्या डॅा. द्वारकानाथ कोटणीस यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित होत्या.

सोलापूरचे विमानतळ सुरु होईल तेंव्हा होईल, मात्र स्मार्ट सोलापुरातील स्मार्ट आणि कर्तृत्ववान कन्यांनी मात्र भरारी घेत थेट हवाई सुंदरी होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. त्यासाठी त्यांना फायदा झाला तो डॅा. द्वारकानाथ कोटणीस स्मारकात सुरु असलेल्या चीनी अभ्यास वर्गाचा. येथील अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर या चार मुलींनी हवाई सुंदरी पदासाठी परिक्षा दिली आणि त्यांची निवडही झाली. विशेष म्हणजे या चारही जणी मध्यमवर्गीय कुटुंबांतील आहेत.

श्रद्धा सुनील आबुटे, अंकिता बिरप्पा पुजारी, ऋतुजा राजू मनगावाले आणि वैष्णवी मंगेश शिंदे या त्या चार मुली. त्यांचे शिक्षण सोलापुरातील महाविद्यालयांतच झाले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी चीनी भाषेच्या वर्गात त्यांनी प्रवेश घेतला. सहा महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. हवाई सुंदरी होण्याच्या ध्येयाने त्यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला. एअर इंडिया कंपनीतील ज्येष्ठ कर्मचाऱ्यांनीही त्यांना सोलापुरात येऊन मार्गदर्शन केले आहे. या निवडीबद्दल वर्गचालक रमेश मोहिते यांनी त्यांचे अभिनंदन केले.

हवाई सुंदरी म्हणून काम करताना सोलापूरचे नाव लौकीक करण्याचा आमचा प्रयत्न असेल. डॅा. कोटणीस यांची जन्मभूमी सोलापूर नसली तरी कर्मभूमी होती. दुसऱ्यासाठी त्याग करा हा त्यांनी दिलेल्या संदेशाचे आम्ही पालन करू, असा विश्वास या चारही कन्यांनी व्यक्त केला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत