सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी रवी राणांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा

अमरावती : रायगड माझा

आमदार रवी राणा व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुंबई येथील सिटी बँकेमध्ये ९०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करत सोशल मीडियावर खोटे मॅसेज प्रसारित केले होते. या प्रकारामुळे खा.आनंदराव अडसूळ यांनी त्यांनी आपली बदनामी केली, असा आरोप करत रवी राणा व कार्यकर्त्यांविरोधात गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अॅट्रॉसिटी कायद्यान्वये तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून, खा.आनंदराव अडसूळ आणि आ.रवी राणा यांच्यातील वाद या प्रकाराने चिघळण्याची शक्यता आहे.

खातेदार व कर्मचाऱ्यांच्या ठेवीतील रकमेत मुंबई येथील ‘दि सिटी को. ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड’चे अध्यक्ष असलेले खा.आनंदराव अडसूळ यांनी तब्बल ९०० कोटींचा घोळ केल्याचा आरोप .रवी राणा यांनी केला होता. रवी राणांनी या प्रकरणात त्यांची थेट राष्ट्रपतींकडे तक्रार केली होती. राष्ट्रपतींच्या सचिवालयाने तक्रारीच्या अनुषंगाने लोकसभा अध्यक्षांच्या प्रमुख सचिवांना लेखी पत्र लिहून खा.आनंदराव अडसूळ यांची सीबीआय व ईडी यांना चौकशी करण्याचे आदेश दिल्याबाबतची माहिती रवी राणा यांनी प्रसारमाध्यमांना दिली होती.

परंतु खा.अडसूळ यांनी सदर माहिती ही खोटी व बदनामीकारक असल्याचे स्पष्ट केले होते. दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रवी राणा यांच्याविरुद्ध या प्रकरणात फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे केली होती. त्यानंतर आनंदराव अडसूळ यांनी रवी राणांविरोधात गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. रवी राणा व त्यांच्या कार्यकर्त्यांनी बँकेत घोटाळा केल्याचा आरोप करीत आपल्याविरोधात सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर प्रसारित केले. त्यामुळे समाजात आपली बदनामी झाली, असे त्यांनी तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत