सौंदत्तीजवळ कार कालव्‍यात कोसळून एकाच कुटुंबातील पाच ठार

बेळगाव : रायगड माझा ऑनलाईन 

गोकाक येथून अंत्यसंस्‍कार आटपून घरी परतताना घटप्रभा कालव्‍याजवळ कारचालकाचे नियंत्रण सुटून कार कालव्‍यात बुडाली. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. कारचालक पोहत बाहेर आल्याने त्याचा जीव वाचला आहे. कारमधून सहा जण प्रवास करीत होते. ही घटना कडवी गावाजवळील घटप्रभा डाव्‍या कालव्‍याजवळ घडली आहे.

या अपघातात बुडालेल्या व्‍यक्‍ती : फकीरप्‍पा पुजारी (वय २९), हनमंत पुजारी (६०) नगमाण्णा पुजारी (३८)  पारव्‍वा पुजारी (५०) लक्ष्मी पुजारी (४०) अशी बुडाल्याची नावे आहे. (सर्वजण राहणार कडगी शिवापूर, ता. सौंदती, जि. बेळगाव)

कडवी ग्रामस्‍थांनी ही कार पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्‍न केला. मुरगोड पोलिस घटनास्‍थळी दाखल झाले आहेत. पाण्यात आणखी कुणी बुडाले आहेत का याचा तपास पोलिस करीत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत